वरकुटे -मलवडी येथे म्हसवड नगरपालिकेतील भाजप च्या नूतन नगराध्यक्ष व सर्व भाजप नगरसेवकांचा मुस्लिम समाजातर्फे जंगी सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड| प्रतिनिधी
माण तालुक्यातील वरकुटे–मलवडी येथील मुस्लिम समाजातर्फे म्हसवड नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षांसह सर्व २१ नगरसेवकांचा वरकुटे येथील मशीद प्रांगणात भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुकीचे उत्साहपूर्ण वातावरण आणि मुस्लिम समाजाचा आत्मीयतेने व्यक्त झालेला आनंद यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.
                      नगरसेवक अकील काझी
वरकुटे–मलवडीचा म्हसवड नगरपालिकेशी थेट संबंध नसला तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे गंभीर स्वरूपाचा कब्रस्तान प्रश्न ताणात राहिला होता. अनेक वर्षे रखडलेल्या या मुद्द्यावर काही स्थानिक नेत्यांनी दबाव आणून जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या परिस्थितीत एकाकी पडलेल्या मुस्लिम समाजाने मदतीसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता व  म्हसवड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अकील काझी यांच्याकडे धाव घेतली. काझी यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या लक्षात हा विषय आणत समाजाची सर्व वेदना सांगितली. मंत्री गोरे यांनी तात्काळ दखल घेत समाजाच्या हिताचा निर्णय करून कब्रस्तानची जागा अधिकृतरित्या उपलब्ध करून दिली.
नगरसेवक युवराज सूर्यवंशी
या सकारात्मक निर्णयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. वरकुटे–मलवडीतील मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा न देता भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान केले. विधानसभा आणि त्यानंतरच्या म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याच राष्ट्रवादी नेत्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी विविध डावपेच रचल्याचा आरोप करण्यात आला. मात्र सर्व प्रयत्न धुळीस मिळवत भाजपने ऐतिहासिक 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत विरोधकांना पराभवाचा सामना करायला लावला. याच विजयाचा आनंद वरकुटे–मलवडीतील मुस्लिम समाजाने उत्स्फूर्तपणे साजरा केला.

वरकुटे येथे झालेल्या या कार्यक्रमात नगराध्यक्षा पूजा वीरकर, नगरसेवक अकील काझी, युवराज सूर्यवंशी, स्नेहल सूर्यवंशी, सतीश मासाळ, लखन लोखंडे, अभिषेक वीरकर, दीपाली शिंदे, सविता मासाळ, माधुरी लोखंडे, श्रीदेवी पिसे, आकाश पानसांडे, प्रमिला ढाले यांचा शाल, फेटे, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावातून काढण्यात आलेली मिरवणूक, ढोल–ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला.
या प्रसंगी बोलताना नगरसेवक अकील काझी म्हणाले की, मंत्री जयकुमार गोरे यांनी वरकुटे–मलवडीच्या मुस्लिम समाजाचा प्रश्न तात्काळ सोडवत समाजाला न्याय दिला. “गोरेभाऊंच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्षा पूजा वीरकर यांनीही नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. तर नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने झालेला पराभव हा विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन सद्दाम मुल्ला. इंनूस इनामदार. दाऊद इनामदार. हारून मुल्ला. शाहरुख मुल्ला. कमीर इनामदार,शरफूद्दीन शेख, अय्युब मुल्ला,  रिजवान तांबोळी, रज्जाक इनामदार, आदी नी केले होते
या कार्यक्रमासाठी वरकुटे-मलवडी मधील सर्व मुस्लिम व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
वरकुटे–मलवडीतील मुस्लिम समाजाने केलेला हा जंगी सत्कार हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विश्वास, कृतज्ञता आणि राजकीय बदलाची जाणीव व्यक्त करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे उपस्थितांमध्ये दिसून आले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *