महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने म्हसवड मंडलाधिकारी कार्यालयावर मोर्चा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड :(अहमद मुल्ला )
महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने म्हसवड मंडलाधिकारी कार्यालयावर बुधवार दि. ५ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार आसल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे
या निवेदनात म्हणले आहे कि केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅस सिलेंडरचे दर तसेच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून शेतीला लागणाऱ्या खतांच्या किंमतीमध्ये सुध्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हवामान बदलामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत असून अशा अवस्थेत सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दोणे गरजेचे असताना सरकार बेफिकिरपणे वागत आहे. अशा बेजबाबदार सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा काय कळणार माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. या तालुक्यामधील युवकांच्या हाताला रोजगार मिळेल अशा रीतीची एक हि कंपनी व उद्योग नसताना सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना प्रपंच चालविताना सध्याच्या महागाईचा डाळ, तेल, गहू, ज्वारी, पेट्रोल, डिजेल, स्वयंपाक गॅस अशा विविध घरगुती वस्तु खरेदी करताना सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडलेले आहे.
अशा अवस्थेत जगण्यासाठी सरकारने दिलासा देण्याऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात धन्यता मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीला ज्या राहूल गांधीच्या आज्जीने व वडिलांनी देशासाठी प्राण दिला याचा विसर एवढ्या लवकर कसा पडला असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. महागाईवरुन व बेरोजगारीवरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा अनेक प्रकारचे प्रयोग करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ येत्या ५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंडलअधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हणले आहे
या निवेदनावर दिलीप तुपे, तेजसिंह राजेमाने युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, परेशकुमार व्होरा, आदींच्या सह्या आहेत