*वचनपूर्ती , शब्दपूर्ती आणि स्वप्नपूर्तीचा आनंद अवर्णनीय …* *आमदार जयकुमार गोरे :*
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
*आंधळी धरणातून माणगंगेत कृष्णामाईचे पाणी सोडले ! 🌊*
*कृष्णामाई माणगंगेकडे झेपावली, आणि आनंदआश्रूंना वाट मोकळी झाली…..*
*गुरुवर्य कै.लक्ष्मणराव इनामदार (जिहे-कठापूर) योजनेअंतर्गत कृष्णामाई चे पाणी आंधळी धरणामध्ये सोडण्यात आले होते .*
*मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर पहिल्यांदाच हे पाणी माणगंगेत आज सकाळी जलनायक आमदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते मतदार संघातील ग्रामस्थ शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून तलाव्यावरील गेट फिरवून पाणी सोडण्यात आले
या पाण्याने माणगंगा नदीवरील बंधारे भरले जातील त्यामुळे माणगंगा नदी परिसरातील शेतीतील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. हे पाणी पुढे राजेवाडी तलाव पर्यंत जाणार असून अनेक गावचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.*
*पाणी माणगंगेत झेपवताच जमलेल्या समुदायाने जिहे-कठापूरचे पाणी आणून वचनपूर्ती करणाऱ्या आमदार जयाभाऊंचा जयघोष केला.*
*पिढ्यानं पिढ्या फक्त पाण्याची आश्वासन ऐकणाऱ्या जनतेला आमदार जयकुमार गोरे यांनी वास्तव्यात पाणी आणण्याचा शब्द दिला होता त्यासाठी गेले अनेक वर्ष अडथळ्यांवर मात करत जिहे-कठापूरचे पाणी माण तालुक्यात आणून त्यांनी जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण केला हे पाणी आंधळी धरणात येताच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माणदेशी जनतेचा उर आनंदाने भरून आला होता.*
*आज हे पाणी माणगंगेत सोडल्यानंतर अनेकांनी हर्षोल्हासाने बेभान होऊन पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटला.*
*यावेळी सौ.सोनिया गोरे , संजय गांधी , अर्जुन तात्या काळे , अतुलदादा जाधव , इंजि.सुनील पोरे , विजय सिन्हा, डॉ मोडसे, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले , सिद्धार्थ गुंडगे , गणेशशेठ सत्रे , दादासाहेब काळे , किसनशेठ सस्ते , अखिल काझी ,बाळासाहेब पिसे, विलासराव देशमुख , डीएस भाऊ काळे , बाबासाहेब हुलगे , कृष्णा सिंचन विभाग सातारा कार्यकारी अभियंता प्रगती यादव मॅडम, आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांचे सर्व समर्थक , पदाधिकारी, पत्रकार बांधव , मतदारसंघातील ग्रामस्थ , शेतकरी मोठ्या संख्येने या सुवर्णक्षणासाठी उपस्थित होते.*