धनगर समाजाच्या एसटी आरक्षण प्रश्नी म्हसवड येथील उपोषण कर्त्यासोबत तातडीने बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याबाबचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनास प्रतिसाद देत येथील धनगर समाजातील तीन तरुणांनी गेली पंधरा दिवसापासुन सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
येथील धनगर समाजातील जेष्ठ कार्यकर्ते बबनदादा विरकर व दिपाली विरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उत्तम विरकर,जयप्रकाश हुलवाल या उपोषण कर्त्यांनी उपोषण सोडले. गणेश केसकर या उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सातारा येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दोन दिवसापुर्वी दाखल केले गेले होते. 26 जानेवारी पासुन हे तीन तरुण आमरण उपोषणास येथील पालिकेसमोर बसले धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश आहे परंतू धनगर ऐवजी धनगड अशी शब्दात झालेली चुक दुरुस्ती करण्यास राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी व धनगर समाज बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. बेल भंडाराचे अध्यक्ष,धनगर समाजातील युवा नेते बालाप्रसाद किसवे यांनी धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येथील उपोषण आंदोलनकर्त्याशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क साधून चर्चा घडवून आणली या चर्चेत आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवायला तयार आहे, हे सरकार तुमचं आहे. त्यामुळे उपोषण सोडवून मुंबईस बैठक घेत आहोत या बैठकित चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवून घेणे बाबतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन करीत उपोषण कर्त्यांना मुंबईत बैठकीसाठी चर्चेस येणे बाबतची विनंती करुन श्री.बालाप्रसाद किसवे यांना बैठकीची वेळ व तारीख देत असल्याचे सांगितले नंतर श्री बाळाप्रसाद किसवे हे मुंबईहून म्हसवड येथे उपोषण कर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देऊन उपोषण सोडविण्यात मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले होते. अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील,माणचे तहसिलदार विकास अहिर,म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने आदी समवेत श्री.किसवे यांनी येथील उपोषण कर्त्यांसह या उपोषणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून हे उपोषण थांबिण्याची विनंती केली. यावेळी बबनदादा विरकर डॉ. प्रमोद गावडे,दादासो दोरगे,बाळासाहेब मासाळ,बाळासाहेब काळे,अशोक राजगे, आप्पासाहेब पुकळे, तुषार विरकर,बाबासाहेब माने,पोपट रुपनवर, डॉ.सुरेश मासाळ आदी उपस्थित होते हा संवाद घडवून आणण्यात धनगर समाज नेते बालाप्रसाद किसवे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. याबरोबरच ओबीसी नेते, सोमनाथ काशीद, कुणबी नेते रणजित भाकरे आदींनी सहकार्य केलेबद्दल डॉ.प्रमोद गावडे यांनी आभार मानले याबरोबरच या आंदोलनास माजी मंत्री विरोधी पक्ष नेते जयंत पाटील,माणचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख,अनुराधा देशमुख, उत्तमराव जानकर,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई,राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप,काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील आदी मान्यवरासह गावोगावच्या धनगर समाज बाधवांनी भेटी देऊन उपोषण कर्त्यांना पाठींबा दिला याबरेबरच माण,खटाव,आटपाडी, माळशिरस इत्यादी तालुक्यातील धनगर समाज बांधव विशेषत: महिलांनी या आंदोलनात सहभागी होऊन या एसटी धनगर आरक्षण प्रश्नी पाठींबा दिलेबद्दल त्यांचेही आभार मानले.