“अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी नवरत्न (भैरवनाथ) गणेशोत्सव मंडळाची ₹21 हजारांची देणगी, सामाजिक बांधिलकीची नवी दिशा”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज : प्रतिनिधी
उंब्रज बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची उंब्रज व परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या उपक्रमामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडणार असून पुतळा हे प्रेरणास्थान ठरणार आहे.
या स्वप्नपूर्तीसाठी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज व ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत. पुतळ्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रतिष्ठानतर्फे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नवरत्न (भैरवनाथ) गणेशोत्सव मंडळ, उंब्रज यांनी तब्बल ₹21,000/- ची देणगी प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली आहे.
नवरत्न गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक उपक्रमांत नेहमीच आघाडीवर राहिले आहे. मतिमंद मुलांना अन्नदान करणे, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांतून मंडळाने आपली सामाजिक जबाबदारी सतत जपली आहे. याच परंपरेला पुढे नेत मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी योगदान देत एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
मंडळाच्या या उपक्रमामुळे तरुणाईमध्ये सामाजिक बांधिलकीबरोबरच शिवरायांच्या विचारांचे बीज रुजेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. उंब्रज व परिसरातील नागरिक मंडळाच्या या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करीत आहेत.
छत्रपतींचा पुतळा उभारणीचा हा उपक्रम सामाजिक एकतेचे व इतिहासप्रेमाचे प्रतीक ठरत असून, पुढील काळात या ठिकाणाचे शिवप्रेरणास्थळात रूपांतर होणार यात शंका नाही.

