मराठीचा सन्मान वारकऱ्यांसाठी अभिमान: ह. भ. प आनंदराव देसाई महाराज

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड: प्रतिनिधी श्रीकांत जाधव

दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल पाटण तालुका वारकरी साहित्य परिषद,पाटण तालुका वारकरी संघ व स.स.जनार्दन महाराज सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देसाई महाराज बोलत होते.

यावेळी पाटण तालुका वारकरी साहित्य परिषदेचे व पाटण तालुका वारकरी संघाचे अध्यक्ष विलासराव माने,ह.भ.प.पप्पू महाराज नाडेकर,ह.भ.प.अनिल महाराज पापर्डेकर, मठाधिपती ह.भ.प.उत्तम महाराज आंब्रगकर, जनार्दन महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,,ह.भ.प.मनोहर महाराज वसंतगडकर,ह.भ.प.रमेश महाराज काजारी,ह.भ.प.हणमंत महाराज अभयचीवाडीकर,सकपाळ गुरुजी पाटण,आनंदराव माथने, रामचंद्र जगदाळे, बाळू नाना ठोमसेकर, चंद्रकांत लोहार, बावडेकर दादा, भिमराव दादा मुंडेकर,डॉ.आण्णासो देसाई यांच्यासह कराड पाटण तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल साखर वाटप करुन वारकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.स्वागत विलासराव माने यांनी केले प्रास्ताविक उत्तम महाराज यांनी केले तर आभार बाळासाहेब शिंदे यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!