व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते चाफळ पाटण :प्रतिनिधी
डोंगर माथ्यावर वसलेल्या जंगलवाडी येथे प्रतिवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.महिलांना आठवड्यातून एकदा डोंगरातून चढउतार करून गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर कपडे धुण्यासाठी यावे लागत आहे.
जंगलवाडी हे गाव निम्मे पाटण तालुक्यात आणि निम्मे कराड तालुक्यात येत असल्याने नेते मंडळींना निधी देण्यासाठी पण अडचणी निर्माण होत असतात. तरी ना. शंभूराज देसाई यांनी दोन्ही तालुक्यातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करून पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. टँकर तत्काळ सुरू झाल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली. दोन महिन्यांपूर्वी जंगलवाडी येथील ग्रामस्थांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे जंगलवाडी चा पाणी प्रश्न मांडला होता. या गावाला सद्यस्थितीत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. याचीच दखल घेत ना. देसाई यांनी संबंधितांना तातडीने सूचना दिल्याने जंगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.
गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू झाल्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी ना.देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.