सातारा येथे होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य मेळावा*यंत्रणांनी समन्वयाने यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते

सातारा

      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अंत्य उल्लेखीनय काम केले आहे. या योजनेचा मेळावा रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास सुमारे 50 हजार महिला येणार असून यंत्रणांनी समन्वयाने काम करुन मेळावा यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

     जिल्हाधिकारी कार्यालयातील रविवारी होणाऱ्या मेळाव्या विषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदा, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
          या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे 50 हजार महिला या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून त्या दृष्टीने वाहन व्यवस्था, वाहतूक, ट्राफीक, वाहनतळ, व्यासपिठ नियोजन, पाणी व स्वच्छतेची व आसन व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत करण्यात आलेल्या नियोजनांचा सखोल आढावा घेतला.

     मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मेळाव्यात प्रातिनिधीक स्वरुपात लाडक्या बहीणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राखीही बांधणार आहेत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!