मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन. जनतेने शासन योजनांचा तत्काळ लाभ घेण्याचे प्रांताधिकारी महेश पाटील यांचे आवाहन
खासदार सुनिल तटकरे,श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा महीला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला प्रशासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याच्या हेतूने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात महसूल,कृषी,ग्रामविकास,नगरविकास,आरोग्य इत्यादी विभागांशी निगडित विविध योजना आणि सेतू केंद्रा अंतर्गत येणारे दाखले,आधार नोंदणी,आधाराचे अद्यावतीकरण अशा विविध बाबींसाठी शासन आपल्या दारी २०२४ चे आयोजन दिनांक २४ फेब्रुवारी रोजी श्रीवर्धन येथे मध्यवर्ती असलेल्या प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी तळा येथे द.ग.तटकरे महाविद्यालयाचे प्रांगणात आणि दिनांक २ मार्च रोजी म्हसळा येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात करण्यात आले आहे.शासन आपल्या दारी आयोजीत उपक्रमास खास करून खासदार सुनिल तटकरे आणि आमदार तथा महीला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आयोजीत शासन उपक्रमाच्या आयोजनात अग्रणी असणार आहेत.शासनाच्या संबंधित सर्व योजनांचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात येणार असल्याने श्रीवर्धन म्हसळा आणि तळा तालुक्यातील नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.