मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’चा दिमाखदार सोहळा ३ जूनला! गुणवंत, कर्तृत्ववान, आपल्या माणसांचा सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई | प्रतिनिधी
प्रसारमाध्यमं ही केवळ माहितीचा स्रोत नसून समाजाचे आरसे आणि दिशादर्शकही आहेत. या माध्यमांच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘माई मीडिया २४’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’ हा भव्य सोहळा आज ३ जून रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे रंगणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, नाट्य-सिनेमा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सन्मान केला जाणार आहे. यंदाचा साहित्य क्षेत्रातील विशेष मीडिया एक्सलन्स पुरस्कार माननीय विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिला जाणार आहे.

त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील पुढील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे:

प्रा. राम शिंदे, सभापती (विधान परिषद)

मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

विजय पाटकर, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

नीलम शिर्के-सामंत, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद

तसेच खालील क्षेत्रांतील व्यक्तींनाही ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ने सन्मानित करण्यात येणार आहे:

सयाजी शिंदे (निसर्ग संवर्धन)

प्रसाद गावडे (‘रानमाणूस’ उद्योग व पर्यटन क्षेत्र)

सुजाता रायकर (थॅलेसेमिया मुक्ती दूत)

डॉ. प्रदीप ढवळ (सांस्कृतिक साहित्य)

अँड. संगीता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण)

संतोष पवार (लोककला संवर्धन)

वैदेही परशुरामी (लक्षवेधी अभिनेत्री)

नीतिन केळकर (पत्रकारिता जीवनगौरव)

अनन्या गोयंका (शिक्षण आणि सामाजिक कार्य)

किशोर आपटे, मोहन बने, श्रीकांत बोजेवार, संजीव भागवत, विशाल पाटील, प्रेरणा जंगम, श्वेता वडके, रविराज इळवे – हेही पत्रकारिता, छायाचित्रण व सामाजिक कार्यातील योगदानासाठी सन्मानित होणार आहेत.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ पुरस्कार वितरण नव्हे, तर थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा संवर्धन, निसर्ग-संवर्धन, पर्यावरण व पर्यटन या विषयांवर जनजागृतीही होणार आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक आणि आयोजक पुढीलप्रमाणे आहेत:
संस्थापिका अध्यक्षा – शीतल हरीष करदेकर
कार्याध्यक्ष – सचिन चिटणीस, कपिल देशपांडे
तांत्रिक व व्यवस्थापन विभाग – चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील
कलाविभाग – गणेश तळेकर, सुरज खरटमल, विजय कांबळे
सहकार्य – प्लॅनेट मराठी

समाजमाध्यम क्षेत्रातील स्वतंत्र पत्रकार आणि फोटो जर्नलिस्टसाठी कार्यरत ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ (माई) ही संस्था पत्रकार व माध्यमांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. बातम्या देण्याबरोबरच सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा ध्यास घेतलेली ही संस्था ‘लोकजागर चळवळ’ीतून समाजाशी संवाद साधत आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, माध्यमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!