दहिवडी येथील प्रसिद्ध हजरत सैय्यद कादरशाबाबा यांचा ऊरूस २३ डिसेंबर पासून उत्साहात सुरु.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
दहिवडी ता.माण,जि.सातारा येथील प्रसिद्ध देवस्थान,हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाणारे हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ यांचा २७ वा वार्षिक ऊरूस दि. २३/१२/२०२३ ते २६/१२/२०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ हे हिंदू मुस्लिम भक्तांचे पवित्र श्रध्दा असून मोठ्या संख्येने भाविक भक्त ऊरुसामध्ये हजेरी लावतात. जागृत देवस्थान अशी बाबांची ख्याती आहे. या वर्षी २७ व्या ऊरुसा निमित्त नवनवीन योजना राबविल्या जाणार आहेत त्यामध्ये बाबांच्या मिरवणुकी मध्ये दि २५ डिसेंबर२०२३ रोजी रथाचे आयोजन केले आहे. अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने अँड. श्री. महेश चंद्रकांत वसव (भैय्या साहेब) यांनी दिली.

ऊरुस कार्यक्रम खालीलप्रमाणे.
शनिवार दि.२३/१२/२०२३ रोजी संदल असून सायं.७ वाजता चंद्रकांत शंकरराव वसव यांचे निवास स्थानाहून संदल, झेंडा आणि चादर यांची भव्य शाही मिरवणूक दहिवडी शहराचे मुख्य रस्त्याने दर्गाह शरीफ येथे पोहोचेल. रात्री ८ वाजता संदल चा कार्यक्रम होऊन रात्री ८.३० वाजता महाप्रसाद होणार आहे.
रविवार दि.२४/१२/२०२३ रोजी उरुसाचा मुख्य दिवस असून सकाळ पासून सायंकाळ पर्यंत दर्गाह दर्शनास खुले राहील. चादर, शेरा वाहिला जाईल. सायंकाळी ७ ते ८ वाजता मुंबई येथील मठाचे मठाधिपती ह.भ .प.श्री गणेशनाथ महाराज यांचे प्रवचन आणी रात्री ८.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे . रात्री ९.३० वाजता शाहीद अजमेरी निजामी कव्वाल यांचा बहारदार कव्वालीचा प्रोग्राम होणार आहे.
सोमवार दि.२५/१२/२०२३ रोजी दु ३ वा. हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ यांची शाही झेंडा मिरवणूक दर्गाह शरीफ येथून निघेल त्यामध्ये प्रसिध्द बँड, बेन्जो पार्टी, झांजपथक, हलगी पथक, रातब, दांड पट्टा, घोडे, डोली बाजा व इतर आकर्षक देखावे सामिल होणार आहेत. शाही मिरवणूक दहिवडी शहराचे प्रमुख रस्त्याने येवून दर्गाह शरीफ मध्ये रात्री ८.३०वाजता पोहोचेल. त्यानंतर रात्री ९ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मंगळवार दि.२६/१२/२०२३ रोजी सकाळी ९ वा.जियारात (सांगता) होईल. या उरुसाचे कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने अँड. श्री. महेश चंद्रकांत वसव ( भैय्या साहेब ) यांनी केले आहे.