गोंदवले खुर्द येथे तरुणाचा मृतदेह आढळून एकच खळबळ – दहिवडी पोलिसांचा तपास सुरू

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज प्रतिनिधी अहमद मुल्ला
म्हसवड :-प्रतिनिधी
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द परिसरात एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक 30 ऑक्टोबरच्या रात्री ते 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

या प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 43/2025 बी.एन.एस.एस. कलम 194 नुसार नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव जाकीर ताजुद्दीन मुलानी (वय 35 वर्षे, रा. गोंदवले खुर्द, ता. माण, जि. सातारा) असे असून, त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे प्राण गमावले हे अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेबाबत मयताची वहिनी पायल हुसेन मुलानी (वय 32 वर्षे, व्यवसाय घरकाम, रा. पळशी, ता. माण) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या सुमारास गोंदवले खुर्द गावच्या हद्दीत ढोनीचा ओढा, पोळ वस्ती येथे जनार्दन पोळ यांच्या घराच्या मागे जाकीर मुलानी हे मृत अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस नाईक एस.एस. म्हामणे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर.पी. खाडे करत आहेत आहे.

मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी तजवीज ठेवली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, अहवाल आल्यानंतर अधिकृत माहिती समोर येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय
या घटनेनंतर परिसरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. मृत्यूचा प्रकार अपघात आहे की आत्महत्या, याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *