व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) उंब्रज: प्रतिनिधी श्रीकांत जाधव
उंब्रज पोलिसांच्या या तत्परतेला तक्रारदाराने सलामच केला. तर परिसरातून पोलिसांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेश्मा शिवाजी चव्हाण रा राहूडे या कराड ते ठाणे असा प्रवास करीत असताना त्यांची बॅग ट्रव्हॅल्स मधे विसरली सदर बाबत त्यानी उंब्रज पोलीस ठाणे येथे येऊन माझी पर्स खाजगी बस मध्ये विसरली आहे. व त्यामध्ये माझे ४ तोळे सोन्याचे दागिने आहेत परंतु मला त्या गाडीचा नंबर व इतर काहीही माहिती नाही. असे सांगितले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय रविंद्र भोरे यांनी पोलीस हवालदार ब. नं. २३२१संजय धुमाळ व ट्राफिक कॉन्स्टेबल ब. नं. २८ हेमंत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल थोरात याना सदर बाबत सूचना दिल्या असता त्यानी आजू बाजूला विचारपूस करून तसेच तासवडे टोलनाका येथे चौकशी करुन गाडी नंबर वरुन मोबाईल नंबर शोधला त्यावरून गाडी मालकाला संपर्क करुन विचारपुस केली असता गाडीमध्ये सदर बॅग व त्यामधील साहित्य असलेबाबत सांगितले. स्वत: ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्सचे गाडी मालक यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत उंब्रज पोलीस ठाणे येथे येऊन विसरलेली बॅग संबंधितांच्या सुपूर्द केली. या कामी तत्परता दाखविणारे पोलीस अंमलदार व ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स चे मालक आणि पोलीस दलाचे ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे.