व्हिजन २४ तास न्युज नेटवर्क
कुलदीप मोहिते
कराड: प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी व्यक्त केली
सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा असे वर्णन केलेल्या महाराष्ट्राच्या उभारणीत सातारा जिल्ह्याने आर्थिक,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात भर घातली त्यामध्ये जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचे योगदान राहिले आहे देशाची सीमा सुरक्षित करताना जिल्ह्यात शांतता सामाजिक शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेत जिल्ह्यातील आजी /माजी सैनिकांनी प्रगतीत हातभार लावला महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त आजी-माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबियांची संख्या आहे
सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व प्यारा मिलिटरी फॉर्सेस मधून निवृत्त झालेल्या सैनिकांचा समावेश आहे जिल्ह्यातील या सैनिकांनी 1948, 1961, 1962, 1971, 1999 या युद्धामध्ये निरनिराळ्या लढाया मध्ये भाग घेऊन जिल्ह्याचा लौकिक वाढवला देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी महाराष्ट्रातील सैनिकांचे गुण ओळखून जवानांना प्राधान्य दिले सेवेत असणाऱ्या जवानांनी आजही मराठी बाणा जपला आहे भारत भूमीच्या संरक्षणात योगदानाची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक सैनिकांना शौर्य पदकानी सन्मानित केले आहे
परंतु सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त सैनिक 1948, 1962,1971, व 1999 या युद्धामध्ये व जम्मू-काश्मीर ऑपरेशन रक्षक अशा अनेक ऑपरेशन आतंकवादी मोहिमेत आतंक वाद्याशी दोन हात करताना शहीद झाले आहेत.
1)यामध्ये खास करून वाई तालुक्यातील देगाव गावचे सुपुत्र सॅपर लक्ष्मण पवार बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुणे मध्ये कार्यरत असताना 2 डिसेंबर 1948 मध्ये शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना मरनोप्रांत वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आज त्यांचे पुणे बी. ई.जी. ट्रेनिंग बटालियन 2 या ठिकाणी भव्य स्मारक 20 ऑगस्ट 1999 ला उभारण्यात आले आहे व बी. ई.जी. पुणे येथे 2 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या परिवाराचा सन्मान भारतीय सेनेचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
२) कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावचे सुपुत्र शहीद जवान हवलदार शिवाजी बाळू जगताप हे ऑपरेशन रक्षक जम्मू-काश्मीर कुपवाडा येथे ते आतंकवादी मोहिमेत लढताना शहीद झाले त्यांना मरणोप्रांत कीर्ती चक्र देऊन भारत सरकारने सन्मानित केले त्यांच्या 6 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये त्यांचे नावाचे अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या कुटुंबाची दुरावस्था आहे शासनाने त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही त्यांच्या मागण्या आज तागायत महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहेत.
3) माण तालुक्यातील दहिवडीचे तुकाराम वसंतराव जाधव यांना शौर्य चक्र देऊन भारत सरकारने सन्मानित केले.
4) खटाव तालुक्यातील विसापूर पुसेगाव येथील सुभेदार एस.सावंत शौर्यचक्र देऊन भारत सरकारने सन्मानित केले.
5) कराड तालुक्यातील अंतवडी गावचे सुपुत्र 1999 कारगिल युद्धातील शहीद महादेव निकम त्यांचे गावी त्यांचे स्मारक असून त्याचे ग्रामपंचायत नोंद नाही व त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न अजून शासन दरबारात प्रलंबित आहेत
असे कराड तालुक्यामध्ये 25 ते 30 शहीद जवान कुटुंबीय आहेत व सातारा तालुक्यामध्ये 50 ते 60 शहीद जवान कुटुंबे आहेत
असे सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील अनेक शहीद जवान कुटुंबीय या शहीद जवान कुटुंबीयांकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष दिले नाही शासन दरबारी अनेक समस्या शेत जमिनी बाबतचे प्रश्न प्रलंबित आहेत.
कराड तालुक्यातील सीएसडी कॅन्टीन ईसी एच एस पोलिकलिनिक जागेबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा शासन गांभीर्याने लक्ष देत नाही.
कोणत्याही ठिकाणी शासन , जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय शहीद जवानाचे शहीद दिवस साजरे करत नाही ही शोकांतिका आहे.
सर्व शहीद जवानांचे वॉर मेमोरियल सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावे व त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात.
देश सेवा बजावून संरक्षण खात्यातून प्रत्येक वर्षी आर्मी. नेव्ही, एअर फोर्स आणि प्यारा मिल्ट्री फॉर्सेस मधून अनेक सैनिक सेवानिवृत्त होऊन माय भूमीत परतत आहेत अत्यंत उमेदीच्या वयात देशाची सेवा केल्यानंतर वयाच्या 35 ते 40 वर्षात हे सैनिक निवृत्त होतात सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सुरू होतात सुरुवातीला संरक्षण खात्यात काम केल्यानंतर निवृत्तीनंतर सिविलियन लोकांशी जुळवून घेताना त्यांना कसरत करावी लागते व त्यांचे महसूल पोलीस प्रशासनामध्ये त्यांच्यावर खोटे गुन्हे ,तक्रारी दाखल करून त्यांना अनेक समाजकंटक त्रास देत असतात अशा सर्व बाबीमुळे शहीद जवान परिवार आजी/माजी सैनिक अनेक त्रासातून शूरवीरांच्या सातारा जिल्ह्यामध्ये त्याची प्रत्येक शासन दरबारी ससे होल पट चालू आहे.
आज सातारा जिल्ह्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे असताना सुद्धा आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, शहीद जवान कुटुंबिय यांना न्याय मिळाला नाही अशी भावना सर्व सातारा जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या परिवारामध्ये आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आजी/ माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निर्णायक भूमिका घेतली यात तीळ मात्र शंका नाही. असा इशारा प्रशांत कदम यांनी यावेळी सरकारला दिला