–नुकत्याच जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या कुस्ती, बालक्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ या शाळेने उज्ज्वल यश मिळवून नावाप्रमाणेच आपली कामगिरी नंबर एक ठेवली आहे.
शाळेने पहिल्याच प्रयत्नात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत शाहिरी पोवाडा स्पर्धांमध्ये लहान गटामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक व माण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.यामध्ये अर्णव जाधव ,यशवर्धन निकाळजे, साहिल दडस,अनिश डोईफोडे, सोहम डमकले,अविष्कार सावंत, जाहिद मुजावर ,स्वराज केंगार या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच गीत मंच स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून उज्ज्वल यश मिळवले आहे. यात स्वराज जाधव, सोहम काटकर, सोहम पवार, अर्णव जाधव ,साई सकट, देवरुद्र कारंडे ,सोहम डमकले, यशवर्धन निकाळजे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत या शाळेचे विद्यार्थी अनिश डोईफोडे ,साहिल दडस ,अनधा हंबीरे यांनी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा लहान गटामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवलेली आहे. स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये २५ किलो वजनी गटांमध्ये संग्राम अमोल बोडरे या विद्यार्थ्याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच बाल क्रीडा स्पर्धेमध्ये २०० मीटर धावण्यामध्ये याच विद्यार्थ्याने लहान गटात तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचे नाव अधोरेखित केले आहे. दहिवडी नं. १ शाळा ही जिल्हा परिषदेची उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. कर्मवीर अण्णा हेही याच शाळेत शिकलेले आहेत.गटविकास अधिकारी प्रशांत राऊत ,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख नारायण आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळा स्थापन समिती अध्यक्ष सनी साठे,अमोल कारंडे ,बाबुराव निकाळजे व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांच्या सहकार्याने गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थी विकासासाठी मुख्याध्यापक विजय चव्हाण, संध्या पोळ ,मनीषा बोराटे, जहांगीर शेख आणि सागर जाधव विशेष परिश्रम घेत आहेत.