भारतीय जनता पक्षाने बहुजन समाजातील सामान्य लोकांना राजकीय पदे दिली आणि बहुजन समाजाचा सन्मान केला. : आ.योगेशअण्णा टिळेकर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
म्हसवड येथे रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी हिंदु बहुजन सन्मान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेचे आयोजन बहुजन समाजाच्या हक्क, अधिकार आणि सन्मानासाठी करण्यात आले होते. ओबीसी भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष करणभैय्या पोरे यांनी या यात्रेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधान परिषदेचे आमदार योगेशअण्णा टिळेकर बोलत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने बहुजन समाजाच्या सन्मानाला उजाळा दिला.
आपल्या मार्गदर्शक भाषणात बोलताना ते म्हणाले हिंदू बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी मी निघालोय… स्वराज्याच्या निर्मितीसाठी मावळे बहुजन समाजातील उभे राहिले. राजकीय गावगाडा बहुजन समाजाने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात चालवला या सन्मान यात्रेद्वारे बहुजनांचा सन्मान प्राप्त करून देणे हा मुख्य हेतू आहे. आजच्या राजकीय जीवनामध्ये जाती-जातींमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरु आहे. मात्र महायुती सरकारने सर्वसामान्यांचा सन्मान करणे सुरु ठेवले आहे. सोनार समाजासाठी महामंडळ, इतर समाजासाठी महामंडळ तसेच ओबीसी समाजासाठी सुद्धा महामंडळाची स्थापना करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही सन्मान यात्रा कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर अठरापगड जाती आणि गाव गाड्यांमध्ये महत्त्वाचा घटक असणाऱ्या सर्व बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे, हा या मागचा हेतू आहे.. ६५ वर्षांनंतर माण तालुक्यात माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी पाणी आणले. बहुजन समाजातील सामान्य लोकांना भारतीय जनता पक्षाने राजकीय पदे दिली आणि बहुजन समाजाचा सन्मान केला.बहुजनाच्या विचारांचा त्यागाचा इतिहास संवर्धन व्हावे यासाठी कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिला.
आमदार टिळेकर यांनी बहुजन समाजाच्या इतिहासाचा गौरव केला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.

यात्रेच्या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख वक्त्यांची भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामूहिक प्रार्थना सत्रांचा समावेश होता. यात्रेत सहभागी झालेल्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, युवा नेते करण पोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, चिन्मय कुलकर्णी, इंजि. सुनिल पोरे, रत्नदिप शेटे, आणि मार्तंड गुरव यांचा समावेश होता.


