प्रवचनातून ह.भ.प.सतेशकुमार माळवेंचा ज्ञान भक्ती आणि शांतीचा जागर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले – प्रतिनिधी :
सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील मांडवे गावात श्री. हनुमान जयंती उत्सवा निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ह.भ.प.सतेशकुमार मारुती माळवे महाराजांनी श्री चरणी प्रवचनरुपी सेवा दिली.

       यामध्ये त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना परमेश्वराचे अधिष्ठान,कर्मशक्ती, शांती सदविचारधारा,सगुण आणि निर्गुण भक्तीचे अमृतमय विचार दिले. त्यांनी श्रोत्यांना ज्ञान आणि विज्ञानातील सांगड अनेक उदाहरणातून पटवून दिली.मानवी जीवनात असलेली अध्यात्माची गरज,शांततामय जीवनधारा, ईश्वरी रूप ,श्रध्दा,संतांचे विचार,डोळस भक्ती आणि ईश्वरी शक्तीबद्दलचे विचार त्यांनी आपल्या मार्मिक शब्दातून श्रोत्यासमोर व्यक्त केले.

          त्यांनी मानवी जीवनातील शिक्षण,चांगली संगत आणि सुसंस्काराचे महत्व सांगितले.वृक्षारोपण, संगोपन, हुंडाबंदी, जल आणि आर्थिक साक्षरतेवरही त्यांनी आपल्या प्रवचनातून भाष्य केले.प्रवचनावेळी सतेशकुमार माळवे सरांच्या बोधवाणीतील विचार श्रोतेजणांनी अगदी मंत्रमुग्धपणे आणि एकाग्रतेने श्रवण केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!