रथोत्सवा दिवशी नवसाची मुले गुलाल खोबऱ्यानी जोकण्याची वर्षानुवर्षाची परंपरा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सचिन मंगरुळे
म्हसवड प्रतिनिधी –
येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रथोत्सवा दिवशी नवसाची मुले गुलाल खोबऱ्यानी जोकण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून त्याची परंपरा आजही एकविसाव्या शतकात उत्साहात सुरु आहे.
येथील ग्रामदैवत व कुलदैवत श्री सिद्धनाथाला अनेक भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस बोलत असतात आपल्या इच्छेची परिपूर्ती झाल्यावर रिंगावन यात्रेच्या मुख्य दिवशी रथोत्सवाच्या दिवशी दिवसभर मुलांसाठी केलेले नवस फेडण्यासाठी गुलाल खोबरे व्यावसायिकांच्या दुकानात एकच गर्दी असते.नवसाचे गुलाल खोबरे खरेदी करुन रथामध्ये श्रींच्या उत्सव मूर्ती बसवल्यावर गुलाल खोबर्याची उधळण भाविकांकडून ठिकठिकाणी रथ नगरप्रदक्षिणा मार्गावर केली जाते.
सचिन राजमाने गुलाल खोबरे विक्रेता म्हसवड. यावर्षी खोबरे व गुलाल यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने गुलाल खोबर्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.