२७वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान आयोजित आणि ABP माझा प्रस्तुत २७वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी प्रभादेवी, दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.

सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार यंदा “उर्मिलायन” (सुमुख चित्र निर्मित) आणि “वर वरचे वधुवर” (कलाकारखाना निर्मित) या दोन नाटकांना विभागून देण्यात आला.
चित्रपट विभागात “फुलवंती” सर्वोत्कृष्ट ठरला, तर टीव्ही मालिका विभागात “घरो घरी मातीच्या चुली” (स्टार प्रवाह) याने बाजी मारली. लक्षवेधी कथाबाह्य मालिकेचा पुरस्कार “सोहळा सख्यांचा” (सन टीव्ही) या मालिकेला मिळाला. ABP माझा ला सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल म्हणून गौरवण्यात आले.

सर्वोच्च सन्मान “सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना ABP माझाच्या सरिता कौशिक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चित्रपट विभागातील पुरस्कार विजेते:

सर्वोत्कृष्ट अभिनेता: गश्मीर महाजनी (फुलवंती)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: प्राजक्ता माळी (फुलवंती)

सहाय्यक अभिनेता: संतोष जुवेकर (रानटी), सचिन नारकर

सहाय्यक अभिनेत्री: स्पृहा जोशी (शक्तिमान)

विनोदी कलाकार: गौरव मोरे (अल्याड पल्याड)

नाट्य विभागातील पुरस्कार विजेते:

सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुव्रत जोशी (वर वरचे वधुवर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: निहारिका राजदत्त (उर्मिलायन)

सहाय्यक अभिनेता: प्रियदर्शन जाधव (दोन वाजून बावीस मिनिटांनी)

सहाय्यक अभिनेत्री: नम्रता संभेराव (थेट तुमच्या घरातून)
टीव्ही विभागातील पुरस्कार विजेते:

सर्वोत्कृष्ट अभिनेता: तन्मय जक्का (लय आवडतेस तू मला – कलर्स मराठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: रेश्मा शिंदे (घरो घरी मातीच्या चुली – स्टार प्रवाह), सानिका मोजर (लय आवडतेस तू मला – कलर्स मराठी)

सहाय्यक अभिनेता: प्रमोद पवार (घरो घरी मातीच्या चुली)

सहाय्यक अभिनेत्री: प्राजक्ता दिघे (ठरलं तर मग – स्टार प्रवाह)

सोहळ्यास अनेक दिग्गज कलाकार आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली. ABP माझा हे ब्रॉडकास्ट पार्टनर होते, तर राम बंधू मसाले को-पॉवर्ड पार्टनर आणि दिनशॉव आईस्क्रीम टेस्ट पार्टनर होते.
कार्यक्रमाची सांगता संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत केली.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!