उंब्रज पोलीस ठाणे मधील अपघातातील व बेवारस अश्या २९ दुचाकी मूळ मालकांना परत .

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज:प्रतिनिधी श्रीकांत जाधव

      उंब्रज पोलीस स्टेशन आवारातील अपघातातील व बेवारस २९ वाहनांची माहिती घेऊन वाहनांचे मूळ मालकांचा पत्ता शोध घेऊनवाहने मूळ मालकांचे ताब्यात दिलेली आहेत

       उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे यांनी उंब्रज पोलीस स्टेशन आवारामध्ये वर्षांनुवर्षे पडून असलेले अपघातातील व बेवारस वाहने यांची माहिती घेऊन मुद्देमाल कारकून पो.हवा. १२५२दीपक जाधव यांना अपघातातील व बेवारस वाहनांचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करणे बाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे उंब्रज पोलीस स्टेशन आवारातील अपघातातील व बेवारस वाहनांची पो.हवा. दीपक जाधव पो. हवा. संजय धुमाळ पो. कॉ. मयूर थोरात पो. कॉ.गणेश कुंदे पो. कॉ. मासाळ होमगार्ड जंगम खंडाईत तसेच श्री विजय ओतारी यांनी माहिती घेऊन वाहनांचे मूळ मालकांचा पत्ता शोध घेऊन त्यांना संपर्क करून त्यांना उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये बोलावून एकूण २९ दुचाकी वाहने मूळ मालकांचे ताब्यात दिलेली आहेत. यावर वाहन धारकांनी समाधान व्यक्त करून सातारा पोलीस दलाचे आभार मानले.

       सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर शेख साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो आचल दलाल मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री अमोल ठाकूर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे पो. हवालदार दीपक जाधव पोलीस हवा. संजय धुमाळ, पो.कॉ. मयूर थोरात, पो. कॉ. गणेश कुंदे, पो.कॉ. मासाळ, होमगार्ड जंगम, खंडाईत, तसेच श्री विजय ओतारी यांनी केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!