संभाजी भिडे यांच्या विरोधात म्हसवड शहरात थाळी नाद मोर्चा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
शाहु, फुले, आंबेडकर विचार मंच, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने म्हसवड शहरात थाळी नाद मोर्चा काढण्यात आला.
  महात्मा फुले यांच्या बाबतीत अपशब्द वापरणाऱ्या  संभाजी भिडे यांच्या वर कारवाई करावी , देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा.या मागणीसाठी शहरातुन निषेध मोर्चा काढण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी (मनोहर कुलकर्णी) याच्या विरोधात सिध्दनाथ मंदिर ते म.फुले चौक मार्गे मोर्चा काढण्यात आला.
या मध्ये शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.प्रा.विश्वभंर बाबर, प्रा. कविता म्हेत्रे, किशोर सोनवणे, विकास गोंजारी,जय ,राज राजेमाने,रणजीत येवगे, दाऊद मुल्ला, राजकुमार डोंबे,परेश व्होरा, विलास रुपनवर, बाळासाहेब आटपाडकर, अजित केवटे, इ. कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण व बहुजन शिक्षणाचे कार्य अठराव्या शतकामध्ये ताकतीने आणि जोमाने केले म्हणूनच आज बहुजन व स्त्रिया आपल्या पायावरती उभा आहेत.
या सुधारणेला खोडा घालण्यासाठी संभाजी भिडे सारखे नतदृष्टे समाजकंटक प्रयत्न करीत आहेत  .
 संभाजी भिडे यांचे वर देशद्रोह खटला दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
मंडलाधिकारी म्हसवड यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
         एक लाख रुपये इनाम 
संभाजी भिडे यांच्या मिशा काढणाऱ्या व्यक्तीला शूरवीर जिजाऊ पुरस्कार व एक लाख रुपये इनाम देण्यात येईल. अशी घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या प्रा.कविता म्हेत्रे यांनी केली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!