बिजवडी : शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे आदेशाने महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा.धैर्यशिल मोहिते पाटील यांचे काम करताना, माण-फलटण-खटावमधील ठाकरेंचे शिवसैनिक नक्कीच आघाडी धर्माचे पालन करताना आघाडीवर राहतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त करतानाच आघाडीमधील सर्वच पक्षातील पदाधिकार्यांनी एकत्र येत शिवसैनिकांना देखील सन्मानाची वागणूक देत सोबत घेणे अपेक्षित असलेचे देखील भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. मविआचे उमेदवार मोहिते पाटील यांना माण विधानसभेतून उस्फुर्तपणे जनतेचा मिळत असलेला पाठींबा पाहता अनेक गटांचे मेळाव्यांचा तडाका सुरु आहे.सर्वच पक्षांमधील प्रमुख मंडळींनी गट-तट न पाहता आघाडीचे एकसंघाने काम करणे संयुक्तिक व योग्य ठरेल. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक कायम संविधानाचे रक्षण, शेतकर्यांचे हित, आणी देशहितासाठी प्राणपणाने लढून सर्वांसोबत मोहिते पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करण्यात यशस्वी होतील असा आत्मविश्वास भोसले यांनी व्यक्त केला.