म्हसवड-मायणी रस्त्यावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड | प्रतिनिधी
मसाईवाडी (ता. माण) हद्दीत शिवनेरी ढाब्याजवळ म्हसवड–मायणी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार दत्तात्रय किसन खाडे (वय 45, रा. ढाकणी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास झाला.

फिर्यादी तुकाराम शंकर खाडे (वय 62, रा. ढाकणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय खाडे हे बजाज प्लॅटिना (क्र. MH 11 BQ 7910) वरून म्हसवडहून घरी जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा झायलो (क्र. MH 05 BJ 1314) ने जोरदार धडक दिली. ही कार आरोपी इलाउद्दीन नसरूद्दीन सय्यद (रा. दिवड, ता. माण) यांच्या ताब्यात होती. भरधाव वेगात केलेल्या या धडकेत दत्तात्रय खाडे गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गु.र.नं. 02/2026 BNS 106, 281, 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन अधिनियम 184 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटना स्थळी सपोनि सोनवणे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोउनि ए. ए. वाघमोडे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *