शिक्षकांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य …अनिल वाघमोडे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
   आदर्श युवा पिढी घडवून आकाशाला गवसनी घालण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांनी   केले.
      क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड अंतर्गत क्रांतिवीर जुनियर कॉलेज , क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड व आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.तर प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे ,मुख्याध्यापिका संस्था सचिव सुलोचना बाबर,प्राचार्य विठ्ठल लवटे मुख्याध्यापक अनिल माने व सुभद्रा पिसे, पोलीस हवालदार अमर नारनवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल वाघमोडे म्हणाले शिक्षक हा समाजाचा आरसा असून समाज घडवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकाकडेच आहे.शिक्षकांमधील सामर्थ्यामुळेच शास्त्रज्ञांनी भारताचे चंद्रयान चंद्रावर पाठवलेले आहे. समाजात आई-वडीलानंतर गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रज्ञावंत, शीलवंत ,नितीवंत  याबरोबरच सर्व गुणसंपन्न शालेय पिढीच्या माध्यमातून बलशाली भारत घडवण्यासाठी शिक्षकाचे काम महत्त्वाचे असल्याचे वाघमोडे यांनी स्पष्ट केले .आई-वडिलांच्या बरोबरच गुरुजनाचा आदर ठेवण्याचे आवाहन करून या सर्वांचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करण्याबाबत सूचित केले.विद्यार्थ्यांनो तुमची प्रगती हीच देशाची प्रगती आहे.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमशीलते बद्दल व दर्जात्मक व्यवस्था याबद्दल वाघमोडे यांनी समाधान व्यक्त केले.तसेच या संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
     संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले समाजातील शिक्षकाचे स्थान अनमोल आहे.एक शिक्षक कर्तुत्वातून काय करू शकतो याचे मूर्तीपंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन बाबर यांनी विद्यार्थ्यांना केले.मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी शिक्षकाची महती व त्यांच्या कार्याबद्दल  प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले,  तसेच डॉक्टर राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अजिनाथ काळेल, प्रज्ञा खांडेकर,चैतन्य उचाळे  या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या गुरुजनांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअनुष्का शेटे व काजल माने या विद्यार्थिनींनी केले.तर उपस्थितांचे आभार उत्कर्ष खाडे हिने व्यक्त केले.
      दरम्यान शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शाळेतील बाल चिमुकल्यानी अस्मिता माने या विद्यार्थिनीला एक दिवसाची मुख्याध्यापिका बनवून तिच्या विद्यार्थी सहकारी शिक्षकाच्या  माध्यमातून दिवसभर शिस्तबद्धपणे शाळा चालवली.या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापनाने करून भविष्यातील शिक्षकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!