निसर्गप्रेमातून शिक्षक रामकृष्ण येकाळे यांनी माळरानावर फुलवले नंदनवन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
इंदापुर (प्रतिनिधी)
विशेष बातमी
गणेश मिंड

   जैवविविधतेतील अन्नसाखळीचे जतन होणे गरजेचे आहे. देशी वृक्षांची जागा परदेशी वृक्षांनी घेतली आहे. शेकडो वर्षांचे आयुर्मान असलेल्या झाडांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. भाऊ श्रीकृष्ण येकाळे याच्या मदतीने राज्याबाहेरूनही काही रोपांची खरेदी आम्ही केली आहे. शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे येथे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.
……….रामकृष्ण येकाळे, शिक्षक

   पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भादलवाडी नजीक
उजनी जलाशयाजवळील माळरानावर कौशल्याने जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करून निसर्गाचे आपणही काही देणे लागतो, या जाणिवेतून एका शिक्षकाने आपल्या सुमारे ४ एकर माळरानावर २२४ प्रकारच्या देशी वृक्षांची व २०० जाती-उपजातीच्या फळझाडांची लागवड केली आहे. यामुळे विविध प्रकारचे पक्षी व वन्यजिवांसाठी हे ठिकाण नैसर्गिक अधिवास बनले आहे.
    भादलवाडी (ता. इंदापूर) येथील रामकृष्ण येकाळे असे या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रामकृष्ण येकाळे यांनी आपल्या चार एकर शेतात ७० प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती व १० प्रकारच्या वेलवर्गीय वनस्पती जोपासणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले आहे. छोट्याशा शेततळ्याच्या माध्यमातून या झाडांना ठिबक सिंचनातून पाण्याची सोय केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी या रोपांची लागवड केली. काही वनस्पतींच्या रोपांच्या खरेदीसाठी त्यांनी आदिवासी बांधवांची मदत घेतली. बाराही महिने या जंगलात कोणते तरी फळ पक्ष्यांना उपलब्ध राहील, याची काळजी त्यांनी वृक्ष लागवड करतानाच घेतली आहे. सह्याद्री सीड्स बँकेने त्यांना रोपे पुरविण्यासाठी मदत केली आहे.

       लागवड केलेले वृक्ष : वड, पिंपळ, नांद्रुक, कडुनिंब, पांढरा पळस, सप्तरंगी, पाडळ, बोधीवृक्ष, अजानवृक्ष, उंडी, मुचकुंद, कदंब, कळंब, गोंदण, बेलपाटा, नाना, रोहीतक, भुत्या, दहिवण, बौद्धनारळ, सफरचंद, लिची, आंबा, पांढरे जांभूळ, बुद्धाज हॅण्ड्स, कोकम, अंबाडा.
इ तसेच इतरही प्रकारची अनेक झाडे येथे पहावयास मिळतात. रामकृष्ण येकाळे सर हे आपली यशोगाथा सांगताना म्हणतात की, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत फुलवलेले हे नंदनवन आहे. बघायला गेलो तर सहजासहजी कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. घरातील इतरही सदस्यांची साथ मिळत गेली, आणि आवड सवडीचा ताळमेळ बसवूनच हे सर्व शक्य झाले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!