माण तालुक्यातील शिक्षिका सौ. जाकिरा मुल्ला यांना शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पवारमळा (भाटकी) येथील तंत्रस्नेही शिक्षिका सौ. जाकिरा जावेद मुल्ला यांनी प्रथम क्रमांक मिळवून तालुक्याचे नाव उंचावले आहे.

या स्पर्धेत विविध गटांमध्ये शिक्षकांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी या गटात सौ. मुल्ला यांनी परिसर अभ्यास विषयावर “पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे पदार्थ” या घटकावर आधारित उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओ सादर केला. त्यांच्या या उपक्रमशीलतेसाठी त्यांना माण तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

गटविकास अधिकारी श्री. प्रदीप शेंडगे यांच्या हस्ते सौ. जाकिरा मुल्ला यांचा सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दंडिले, श्री. गंबरे, केंद्रप्रमुख श्री. दीपककुमार पतंगे तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सहशिक्षिका अरुणा चोपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, पालक वर्ग व शिक्षकवर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

सौ. मुल्ला यांनी सादर केलेला व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सर्वांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!