तात्या राजकारणातील देव माणूस! आमदार निलेश लंके यांची भावनिक प्रतिक्रिया!
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
By;विठ्ठल काटकर
कुकुडवाड प्रतिनिधी
माण तालुका अनेक वर्ष दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात होता, अशा परिस्थिती मध्ये पोळ तात्यांनी या भागाचे नेतृत्व केले, मी आमदार नव्हतो तेव्हापासून पोळ तात्यांना भेटत होतो, त्याचवेळी राजकारणातील हा देव माणूस मला भेटला अशी अतिशय भावनिक प्रतिक्रिया प्रशिद्धीच्या शिखरावर असणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
, माण तालुक्यातील वरकुटे(माळवाडी)येथे जनार्धन विरकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा, शर्यती उदघाट्न कार्यक्रमासाठी जात असताना मार्डी ता. माण येथे स्वर्गीय माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्या यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी युवा नेते मनोजदादा पोळ, सातारा जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सोनालीताई पोळ,यांची उपस्थिती होती. आमदार निलेश लंके पुढे म्हणाले की पोळ तात्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रात तात्यांनी आपल्या कामाने व कर्तृत्वाने ओळख निर्माण केली होती. मतदार संघ राखीव असताना पोळ तात्या आमदार निवडून आणतात हे आम्ही पवार साहेबांच्या कडून नेहमी ऐकत होतो, कारण आमच्या भागात अनेक जाहीर सभा मधून साहेबांच्या भाषणात तात्याच्या नावाचा उल्लेख असायचा, पवार साहेब म्हणायचे इकडे आमदार होण्यासाठी व तिकीट मागण्यासाठी चढाओढअसते मात्र सातारा जिल्यातील माण तालुक्यात माझा एक सदाशिवराव पोळ नावाचा कार्यकर्ता आहे की जो आमदार निवडून आणतो, त्यावेळी खरच वाटायचं की असा कोण माणूस असेल की जो आमदार निवडून आणतो. मात्र नंतरच्या काळात पवार साहेबांनी तात्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या बरोबर आमदारकी दिली त्याच वेळी मात्र पोळ तात्या आम्हाला कळले की हेच ते आमदार निवडून आणणारे सदाशिवराव पोळ. नंतर ज्या ज्या वेळी पोळ तात्यांना भेटलो, त्या त्या वेळी राजकारणातील बारकावे तात्या सांगायचे, तात्याचं बोलण तासंतास ऐकत बसावं असच वाटायचं,पोळ तात्यांचं बोलण, वागण, कामाची चिकाटी, जवळून पहिली व तात्याच्या रूपाने राजकारण व समाजकारणातील देव माणूस आम्हाला त्यावेळी भेटला ही आठवण आजही आहे असे त्यांनी सांगितले. तात्याच्या आठवणी सांगताना आमदार निलेश लंके यांना भरून आले.
युवा नेते मनोजदादा पोळ व सोनालीताई पोळ यांनी आमदार निलेश लंके याचे स्वागत केले.यावेळी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित