​म्हसळ्यात तटकरेंचा ‘पॉवर गेम’; गोगावलेंना धक्का देत अनिकेत पानसरे प्रभारी नगराध्यक्षपदी!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

​म्हसळा : सुशील यादव

रायगडच्या राजकीय पटलावर खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध केली आहे. आमदार भरत गोगावले यांच्या गटाला जोरदार धक्का देत म्हसळा नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांची निवड करण्यात आली आहे.😄
​म्हसळा नगरपंचायतीच्या या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षात अखेर तटकरे यांनी बाजी मारली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यकांसहित ७ नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते त्यांच्या विरुद्ध गटनेते संजय कर्णिक यांनी लढलेल्या कायदेशीर लढाईमुळे या सर्व नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले होते . त्यानंतर आज मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपनगराध्य पानसरे यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. गटनेते संजय कर्णिक यांनी पानसरे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.
​या महत्त्वपूर्ण निवडीच्या संदर्भात रायगडचे
​खासदार सुनील तटकरे ,
​ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
​ माजी आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष
​समीर बनकर व सर अध्यक्ष रियाज घराडे
​नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
​अनिकेत पानसरे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, सरोज म्हशीलकर, जयश्री कापरे, सुनील शेडगे, नौशीन चोगले आणि स्वीकृत नगरसेवक निकेश कोकचा या सर्व नगरसेवकांनी पानसरे यांचे अभिनंदन केले. म्हसळा शहराच्या विकासासाठी पानसरे आता जोमाने काम करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होणार आहे. तोपर्यंत पानसरे म्हसळा नगरपंचायत चे प्रभारी नगराध्यक्ष पद भूषवतील.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *