म्हसवड मंडलासाठी तहसीलदाराची मागणी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
म्हसवड शहर व आसपासचे चार महसूल सर्कल करता नवनियुक्त तहसीलदार मा.श्री अजित जंगम साहेब यांनी दहिवडी येथे बसून कामकाज पाहतात ते कामकाज म्हसवड येथे बसून पाहण्याबाबत* उचित आदेश व्हावे याबाबतचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेऊन भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष करण पोरे यांनी दिले.
निवेदनात म्हसवड साठी नियुक्त तहसीलदार यांनी जर दहिवडी येथील कार्यालयात न बसता म्हसवड येथे बसले तर म्हसवड परिसर व आसपासचे चार महसूल सर्कल मधील *अनेक गरजू लोकांचे ,जनसामान्यांचे ,दाखले प्रतिज्ञापत्र ,रेशन कार्ड संबंधित कामे, तक्रारी, महसुली दावे*,यासाठी दहिवडी पर्यंत हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही व *जनतेचा वेळ व पैसा यामुळे वाचेल* याची माहिती दिली यावेळी महसूल मंत्री यांनी लवकरात लवकर उचित आदेश करीत असल्याचे आश्वासन दिले असल्याचे करण पोरे यांनी सांगीतले