शिंपी समाजाचा १०७ वा भव्य वधुवर परिचय मेळावा – समाजहितासाठी एकात्मतेचा स्तुत्य उपक्रम
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी):
“वधुवर मेळाव्यातून प्रबोधन… प्रबोधनातून वधुवर संशोधन… हीच समाजसेवा…” या ध्येयवाक्याला साकारत समस्त शिंपी समाज महाराष्ट्र आणि सातारा शहर व जिल्ह्यातील सर्व ज्ञाती संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १०७ वा मोफत प्रत्यक्ष वधुवर परिचय मेळावा रविवार, ११ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत सौभाग्य मंगल कार्यालय, गोडोली नाका, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात नामदेव, भावसार, अहीर, वैष्णव, मेरू, तेलगू, माहेश्वरी, रंगारी, दर्जी, छीपा, कोकणस्थ अशा शिंपी समाजाच्या सर्व पोटजातींतील इच्छुक वधू-वरांसाठी प्रवेश खुला आहे. याशिवाय विविध शैक्षणिक पार्श्वभूमी व कौटुंबिक परिस्थितीतील वधुवर – आय.टी., इंजिनिअर, डॉक्टर, वकील, सी.ए., व्यावसायिक, परदेशस्थ, पदवीधर, १०वी, १२वी उत्तीर्ण, विना पदवीधर तसेच प्रथम विवाह, घटस्फोट, नाममात्र घटस्फोटित, कल्याणी, दिव्यांग – यांना सहभागी होता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मा. श्रीकांत आंबेकर – नगरसेवक, सातारा शहर व भाजप अध्यक्ष मा. बाळासाहेब बाचल – नगरसेवक, कोरेगाव मा. बाळासाहेब आंबेकर – ना.स.पा. विश्वस्त, अध्यक्ष केशवराज संस्था, पंढरपूर मा. सुभाष भांबुरे – पत्रकार, फलटण मा. धनंजय बारटक्के – श्री नामदेव शिंपी समाज, खणआळी, सातारा मा. सुनील पोरे – ना.स.पा. जिल्हाध्यक्ष, सातारा मा. चंद्रकांत द. शेळके – अध्यक्ष, समस्त नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था, सातारा मा. सौ. राधा बारटक्के – सप्ततारा महिला सामाजिक संस्था (रजि.), सातारा मा. श्री. सुधीर लंगडे – श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट, प्रतापगंज पेठ, सातारा मा. सुजीत आंबेकर – एनडी टिव्ही प्रतिनिधी, सातारा जिल्हा
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संप्पन्न होत आहे
हा मेळावा केवळ विवाह जुळवण्यासाठी नसून, समाजातील विविध घटकांमधील संवाद वाढवणे, समन्वय निर्माण करणे, विविध शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता असलेल्या वधुवरांना एकत्र आणणे आणि समाजाची प्रगती साधणे हाच यामागील व्यापक उद्देश आहे. विशेषतः घटस्फोटित, दिव्यांग, वयस्क इच्छुक यांनाही या माध्यमातून सन्मानपूर्वक संधी देण्याचा प्रयत्न आहे.
समस्त शिंपी समाज महाराष्ट्र तसेच सातारा शहर व जिल्ह्यातील ज्ञाती संस्था यांनी सर्व समाजबांधव, भगिनींना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इच्छुक वधुवरांसाठी हे व्यासपीठ समृद्ध करावे. समाजाच्या एकतेसाठी, पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुसंस्कारित विवाहसंशोधनासाठी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

