समस्त शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्यातर्फे स्वयंवर वधु वर पालक परिचय मेळावा 2024 . हा मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला या वधुवर पालक परिचय मेळाव्यात जवळपास साडेचारशे वधू-वरांची नोंद झाली.
इंजि सुनील पोरे यांच्या प्रेरणेतून सातारा जिल्हयातील शिंपी समाजाचा हा पहिलाच वधुवर सूचक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवातीला संत शिरोमनी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास,जिल्हाध्यक्ष सुनील पोरे,सतीश वेल्हाळ,मनोज कुबडे यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी कुमारी – सई सचिन बारटक्के. इयत्ता – ९ वी, कु. अंतरा निलेश पाटुकले. इयत्ता – ९ वी कु. अस्मि शैलेश पाटुकले. इयत्ता – ६ वी या शालेय विद्यार्थिनींनी सुंदर अशी गणेश वंदना करुन कार्यक्रमास छानशी सुरुवात केली त्याबद्दल ना.स.प. जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे साहेब यांनी त्यांचा सत्कार केला
नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली तसेच मोठ्या प्रमाणात जाहिरात दार व देणगीदार यांनी सहकार्य करुन कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यास मदत केली
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ह भ प महाराज निवृत्ती नामदास संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हे लाभले तसेच नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष सातारा इंजिनिअर श्री सुनील पोरे साहेब, त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेळके, उपाध्यक्ष श्री सुनील हेंद्रे ,महिला अध्यक्ष सौ मीनाताई बारटक्के.आदी मान्यवर उपस्थित होते
या मेळाव्यासाठी समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज महाडिक, गणेश कुबडे, सुजित आंबेकर, सतिश वेल्हाळ, धनंजय हेंद्रे, ॲड.रविकिरण डोंगरे, भस्मे,अतुल बारटक्के, शिंपी समाज महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले