माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई वावरे बिनविरोध निवड

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
शौकत पठाण

माळशिरस 

       माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पैलवान शिवाजी देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदरची जागा ही रिक्त झाली होती. यासाठी ताई सचिन वावरे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. केवळ एकच अर्ज आल्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी पिटासीन अधिकारी म्हणून वि.ना. पवार यांच्या अध्यक्षखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

       ताई सचिन वावरे यांचा एकमेव अर्ज आल्याने पिटासिन अधिकारी यांनी ताई सचिन वावरे यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणुन निवड झाली असल्याचे जाहिर केले. यानंतर गुलाल व फुलांनी जेसीबीतून मुक्त उधळण करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक , अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!