म्हसवड येथील राज्य महामार्गावरील विद्युत दिवे सुरू करा. ….. विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड बस स्थानका नजीकच्या राज्य महामार्गावरील गेली अनेक वर्षे बंद असणारे विद्युत दिवे तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ कार्यालय पुणे च्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांना प्रा. विश्वंभर बाबर यांनी पुणे येथील कार्यालयात दिले.म्हसवड शहरातून जाणारा सातारा पंढरपूर हा राज्य महामार्ग असून रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी विद्युत दिवे यंत्रणा बसवण्यात आली.
गेल्या काही वर्षांपूर्वी बसवलेली विद्युत यंत्रणा व दिवे आजही फक्त आणि फक्त शो पीस ठरलेले आहेत. अल्पकाळ सोडला तर सदर दिवे गेले अनेक वर्षे बंद आहेत.मध्यंतरी झालेल्या म्हसवड रथयात्रा नियोजन बैठकीवेळी याविषयी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष चर्चा झाली.त्यानंतर सदर कामासंबंधी पुणे कार्यालय अंतर्गत च्या ठेकेदाराकडून किरकोळ मलमपट्टी झाली.थोडेफार काम झाले.मात्र त्यानंतर ते काम तसेच अपूर्ण अवस्थेतअसून सदर ठिकाणची संपूर्ण विद्युत यंत्रणा आजही बंद अवस्थेत आहे.
म्हसवड हे नगरपालिकेचे गाव असून या रस्त्यावरून दळणवळण मोठ्या प्रमाणात सुरू असते.रात्रीच्या वेळी वाहनाची वर्दळ तसेच नागरिकांची ये जा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते.मात्र या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी बसवलेली विद्युत यंत्रणा आजही ठप्प आहे. त्याचा फटका रात्रीच्या वेळी वाहनधारक व स्थानिक नागरिकांना बसत आहे.या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अनेक अपघात होत असून सदरचा परिसर महिलांसाठी असुरक्षित झालेला आहे. नगरपालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता केवळ उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. संबंधित कामाच्या ठेकेदाराची अरेरावी सुरू असून याबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कङक कारवाई करावी अशी मागणी विश्वंभर बाबर यांनी कार्यकारी अभियंता पुणे यांच्याकडे केली आहे.यावेळी कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांनी तातडीने संबंधित ठेकेदार ला फोन लावला व त्याची कान उघडणी केली.लवकरचआपण मागणी केलेले समाज हिताचे काम मार्गी लागेल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांनी यावेळी दिल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!