बस स्थानक परिसरातील बंद पथदिवे सुरू करा . ..प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ….प्रतिनिधी
म्हसवड येथील आगामी रथयात्रा लक्षात घेता म्हसवड बस स्थानक परिसरातील राज्य महामार्गा वरील बंद विद्युत पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रांताधिकारी माण खटाव यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिले आहे.
श्री सिद्धनाथ रथयात्रेनिमित्त म्हसवड येथे अंदाजे पाच लाख भाविक येत असतात. सदर रथयात्रा 13 डिसेंबर रोजी असून बाहेरून येणारे भाविक व स्थानिक रहिवासी यांच्या दृष्टीने अनेक वर्षे बंद असणारे विद्युत दिवे सुरू होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.म्हसवड शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र ते पेाळ पेट्रोल पंप म्हसवड या दरम्यानच्या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये लाखो रुपये खर्च करून अनेक विद्युत पोल व पथ दिवे उभे केले. .काही काळ दिवे सुरू झाले.,खर्चाची बिले काढली.अन दिवे बंद पडले.,आता त्याला अनेक वर्षे होऊन गेली.मात्र याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधीचे लक्ष. सदर रस्ता हा राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय पुणे यांच्या अधिनस्त आहे.
मुख्याधिकारी म्हसवड यांच्याकडे संपर्क साधला असता सदर बाब रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालय अंतर्गत येत असल्याचे सांगितल्याने प्राध्यापक बाबर यांनी याबाबत प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला आहे.
लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धनाथाची रथयात्रा 13 डिसेंबर रोजी असून त्यानिमित्ताने म्हसवड शहरात पाच लाखापेक्षा जास्त भाविक येतात.या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे गरजेचे असते.यामध्ये विद्युत पुरवठा नियमित राहणे हा महत्त्वाचा घटक असल्याचे लक्षात घेऊन प्रा. बाबर यांनी सदर दिवे तातडीने सुरू करावेत याबाबत माणखटावच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे लेखी स्वरुपात मागणी केली आहे. सदर पथदिवे पुर्वरित सुरू होण्यासाठी रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालयाशी अग्रक्रमाने संपर्क साधनेची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली आहे.सदर विशेष संवेदनशील व महत्त्वाचा असून भाविकाच्या हिताचा असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही प्रांताधिकारी गाडेकर यांनी विश्वंभर बाबर यांना दिली आहे.

