२६ जानेवारी रोजी होणाऱ्या आमरण उपोषणावर इंजि. सुनील पोरे ठाम- मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालू राहणार
व्हिजन २४ तास न्यूज
BY; अहमद मुल्ला
म्हसवड
सातारा-पंढरपूर फोरलेन चे काम गत पाच सहा वर्षापासून अत्यंत, संत गतीने सुरू असून म्हसवड पालिका हद्दीतील साखळी पूल ते पिलीव घाटापर्यंतचा रस्ता गेली सहा वर्षापासून नुसता खनुण ठेवला आहे या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. त्याबाबत अनेक संस्था संघटनानी आवाज उठवल्या नंतर खड्यांवर नुसती माती टाकुन खड्डे बुजवण्या चा फार्स करण्यात आला मात्र या मातीमुळे रस्त्यावरून वाहने जाताना व येताना मोठ्या प्रमाणानार धुरळा उडत होता त्यामूळे होणारे नुकसान/ नागरीकांना, व्यावसाईकांना होणारा त्रास याबाबत इजि. सुनील पोरे यांनी म्हसवड शहराच्या रस्त्यालगत व चौका चौकात बॅनर लावून प्रशासनाला जाब विचारला होता व त्यावर त्वरीत उपाययोजना न केल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता याचा परिणाम म्हणून रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात झाली मात्र हे प्रशासनाने चालू केलेले काम म्हणजे नुसते तोंडाला पाने पुसण्या सारखे असल्याचे इंजि. सुनिल पोरे यांनी म्हटले आहे. आमच्या मुख्य मागण्या, पुढील प्रमाणे असून त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालू राहणार असल्याचे सांगीतले
मागण्या :
१) पूर्ण लांबीतील अपूर्ण मो-या / पुल व त्याचे अप्रोच रस्ते तात्काळ पूर्ण करावे
2) फॉरेस्ट किंवा कोर्टकेस मुळे प्रलंबीत रस्त्याचा मुळचा पृष्टभाग सुस्थितीत करावा
3) रस्त्याकडेची कॆलॆली वृक्ष तोडीची पर्यायी वृक्ष लागवड तात्काळ करण्यात यावी
४) शेतक-याच्या नुकसानीचा/भूसंपादनाचा मोबदला त्वरीत देणेत यावा
५) रस्ता कामासाठी झालेल्या विलंबनामुळे/ खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघात ग्रस्ताना नुकसान भरपाई दयावी
६) काँक्रीटी करणावर पाणी मारने व अपूर्ण रस्त्याचे ठिकाणी धुळ उडू नये म्हणून पाणी मारने
आदी न्याय मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण चालू ठेवणार असल्याचे इंजि. सुनील पोरे यांनी सांगीतले