आदर्श युवा पुरस्काराने करण सुनील पोरे सन्मानित
म्हसवड (अहमद मुल्ला )
नाशिक येथे पार पडलेल्या नामदेव समाजोन्नती परिषदेत आदर्श युवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
नाशिक येथे नामदेव समाजोन्नती परिषद तथा नासपचे” अधिवेशन दि 23-24-25 डिसेंबरला तुपसाखरे लॉन नाशिक याठिकाणी पार पडले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता व समाज बांधव दीपक कुमठेकर व मुंबई हायकोर्ट वकील विश्वनाथ टाळकुटे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी नासपचे राज्यअध्यक्ष संजीव तुपसाखरे हे उपस्थित होते.

या अधिवेशनात जीवन गौरव आदर्श माता, आदर्श शिक्षक आदर्शयुवा असे विविध पुरस्काराने समाजातील मान्यवर बांधवाना सन्मानित करण्यात आले यातील आदर्श युवा पुरस्कार भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण सुनील पोरे याना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला करण पोरे यांनी समाजिक व युवक वर्गासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन 2022 या आदर्श युवक पुरस्कारा साठी त्यांची निवड करण्यात आली रोख अकरा हजार , शाल, श्रीफल, गुच्छ, पगडी व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते या महाअधिवेशनास महाराष्ट्रातून मोठ्या संखेने शिंपी समाज बंधु भगिनी उपस्थित होते करण पोरे यांनी पुरस्काराची मिळालेल्या रक्कमेत अजून भर टाकून १२हजार रुपयाची रक्कम नामदे समाजोन्नती परिषदेस दान केली.