वडगाव उंब्रज विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी सुदर्शन कदम तर व्हाईट चेअरमन पदी शिवाजी कदम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
वडगाव उंब्रज:प्रतिनिधी

वडगाव उंब्रज विकास सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे युवा कार्यकर्ते श्री सुदर्शन कदम व व्हाईस चेअरमन पदी श्री शिवाजी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 सदर निवडणूक प्रक्रिया कराड उप निंबधक कार्यालय श्रीमती स्मिता भागवत मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी सर्व संचालक उपस्थित होते नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय ऍड विनायकराव पाटील बापू व स्वर्गीय संभाजीराव कदम आबा यांना अभिवादन केले यावेळी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि स्वर्गीय विनायकराव पाटील बापू स्वर्गीय संभाजीराव कदम आबा विचाराचा वारसा घेऊन आम्ही सर्व संचालक मंडळ काम करू गेली पन्नास वर्षापासून वडगाव विकास सेवा सोसायटी वर ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे एकहाती वर्चस्व ठेवण्यात सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले आहे सध्या संस्थेचे एकूण अकराशे सभासद आहेत कर्ज वाटप तेरा कोटी आहे संस्थेचा व्यवसाय पंधरा कोटी च्या आसपास आहे संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळत आहे संस्थेचे नुकतेच नवीन इमारतीच काम पूर्ण झाले आहे व तेथे कामकाज सुरु आहे जुनी इमारतीमध्ये बी बियाणे व रासायनिक खताचे दुकान सुरु करण्यात आलं आहे विना सहकार नाही उद्धार या उक्ती प्रमाणे कार्य सुरु आहे मागेल त्याला कर्ज मिळते प्रत्येक वर्षी सभासदांना 15 टक्के सभासद लाभांश देण्यात आतापर्यंत संस्थेला यश प्राप्त झाले आहे ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे आभार त्यांनी व संचालक यांनी जो विश्वास दाखविला त्या बद्दल खूप खूप आभार सदर निवडी वेळी ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते सभासद ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद पाटील आबा, खासदार जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष श्री नितीन काका, कराड उत्तर चे आमदार श्री मनोजदादा घोरपडे, कराड दक्षिण चे आमदार श्री अतुल बाबा भोसले, ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर दादा, श्री धैर्यशील कदम दादा, श्री रामकृष्ण वेताळ साहेब, श्री संग्राम घोरपडे बापू यांनी अभिनंदन केले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!