महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कराड नगरीचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 111 जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगम समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली
तसेच पी डी पाटील प्रतिष्ठान गौरव प्रतिष्ठान यांच्यावतीने कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी “शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली” वाहण्यात आली, यावेळी माध्यमिक शाळांमधील १२००० विद्यार्थी – विद्यार्थिनींनी समूह गीत गायनाद्वारे आदरांजली वाहिली.
यावेळी अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले, व यशवंत विचार भावी पिढीला पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे, माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर, सारंग पाटील, अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील, प्रकाश पाटील(बापू), सौ.शोभा पाटील, सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, सुहास पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, राजेंद्र माने, दिलीपराव चव्हाण, ए. एन. मुल्ला, संभाजीराव पाटील, प्रा.रामभाऊ कणसे व नागरीक उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब पाटील प्रस्तावना करताना मान्यवरांचे स्वागत केले, प्रा.कणसे सर यांनी सूत्रसंचालन केले व दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.
टिळक हायस्कूल, एस. एम. एस. इंग्लिश मिडियम स्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ (माध्य.), सरस्वती विद्यामंदिर, दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक शाळा, महाराष्ट्र हायस्कूल, श्री संत तुकाराम हायस्कूल, विठामाता विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, यशवंत हायस्कूल, वेणूताई इंग्लिश मिडीयम स्कूल, शाहीन हायस्कूल आदी.शाळांनी समूह गायनामध्ये सहभाग घेतला होता.
यामध्ये कराड नगरी लोक गर्जले, यशवंत आमुचे भाग्यविधाते, कीर्तीवंत जाहले…. (यशवंत गौरव गीत), झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान…. (देशभक्तीपर गीत) व इतनी शक्ती हमे दे न दाता.(प्रार्थना) विद्यार्थ्यांनी सादर केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.