जिद्द व चिकाटीच्या जोरावर अखंड परिश्रम केल्यास यश हमखास मिळते : एस. आर.बिराजदार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

    जिद्द व चिकाटीच्या जोरावर अखंड परिश्रम केल्यास यश हमखास मिळते असे उदगार म्हसवड पोलीस स्टेशनचे ए पीआय एस. आर.बिराजदार यांनी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी येथे काढले.


    म्हसवड पोलीस स्टेशनचे ए पीआय एस. आर.बिराजदार यांनी आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी येथे सदिच्छा भेट दिली व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्याबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल विरकर, पोलीस संतोष खाडे, तसेच कांतीलाल खाडे तानाजी बुरले उपस्थित होते

     बिराजदार पुढे म्हणाले की, सर्व मुलानी सकाळी लवकर उठून नियमित अभ्यास करावा. आभ्यासात सातत्य ठेवावे .प्रत्यकाने शालेय जीवनात ध्येय निश्चित करावे .डॉक्टर, वकील, इंजिनिअर या बरोबरच प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी. तसेच त्यांनी मुलाना अभ्यासाबरोबरच नियमितपणे व्यायाम करण्याचे आवाहन केले.
       या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल विरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे यांनी सपोनि बिराजदार यांनी म्हसवड परिसरात कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने निर्माण केली व पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले .

      तानाजी बुरले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले .यावेळी तानाजी बुरले , अनिता तोरणे, पल्लवी जगताप , शुभांगी रणदिवे,पूनम शेंडे,व सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!