सुभेदार संतोष बर्गे यांचा सेवानिवृत्त सन्मान सोहळा त्यांच्या मूळ गावी डिस्कळ येथे संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड
रविवार दी.3/3/2024 पे रोजी खटाव तालुक्यातील मौजे डीस्कळ गावचे सुपुत्र सुभेदार संतोष बर्गे हे 28 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे डीस्कळ तालुका खटाव येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक फेडरेशनचे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन जिल्हा सैनिक फेडरेशन सातारा पदाधिकारी व माजी सैनिक यांचे वतीने करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन हे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमा मध्ये मनोगत व्यक्त करताना म्हटले की सैनिक हा कधी रिटायर होत नाही.तो सैन्या मधून रिटायर झाला असला तरी तो समाजामध्ये काम करत असतो काम करत असताना अनेक संघर्ष त्यांना करावे लागतात व आपले असणारे बोनस आयुष्य समाजामध्ये नवीन युवा पिढी ला मार्गदर्शन करून सैन्य सेवेत भरती होण्यासाठी भारत मातेची सेवा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असतात सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिकांची जबाबदारी अजून वाढते तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर सुभेदार संतोष बर्गे यांनी शोषित, वंचित समाजाला मदत करावी व सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम करण्यासाठी भरीव योगदान द्यावे व सैनिक फेडरेशन बरोबर काम करावे संघटित राहावे तसेच प्रशांत कदम यांनी माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांना शासनाकडून मिळणारी अर्थिक मदत व मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली.
, यावेळी उपस्थित जिल्हा संघटक वीलास जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष . विजय जमदाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू केंजळे, उद्योजक . सुरेश गोडसे, त्रिदल सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष . माळी, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष .राजेंद्र बर्गे, जिल्हा अध्यक्ष महिला ब्रिगेड सौ. विद्या बर्गे. प.म.उद्योग विभाग महिला ब्रिगेड अध्यक्ष सौ. उर्मिला पवार,कराड तालुका अध्यक्ष . सदाशिव नागणे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष प्रशांत दुधाने, खटाव तालुका अध्यक्ष . प्रेमचंद जगताप, कोरेगांव तालुका अध्यक्ष रतिकांत शिर्के, कराड तालुका महिला ब्रिगेड अध्यक्ष सौ स्वाती बोराटे सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी, माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय बहुसंखेने उपस्थित होते.