विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम चा अभ्यास करून जागृत व्हावे –  पी. एस.आय. विशाल भंडारी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड :
    युवकांनी सायबर क्राईम व पोलिस स्टेशन कामकाज या बाबत अभ्यास करून अधिकारी बनून समाज प्रबोधन करावे असे प्रतिपादन म्हसवड पोलिस स्टेशनचे पी. एस.आय. विशाल भंडारी  यांनी केले.
      श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथील टी. वाय. बी. कॉम. चे विद्यार्थी यांनी एम. लॉ चे प्राध्यापक  ॲड. राजू भोसले यांच्या मार्गदर्शनखाली “सायबर क्राइम व पोलिस स्टेशनचे कामकाज ” या विषयावर प्रबंध तयार करण्यासाठी “पोलिस स्टेशन विद्यार्थी भेट” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  पोलीस स्टेशनचे पीएसआय विशाल भंडारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
 या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक ॲड. राजू भोसले, कु. शिवानी कालेकर, कु. विजया बागल, कु. हर्षदा वाघ, कु. साक्षी लोटके,  कु. मालती केवटे, यश पिसे, अजित दहीवडे, रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे , वैभव सोनवणे, प्रताप लिंगे हे प्रमूख उपस्थित होते.
       या वेळी पुढे बोलताना पीएसआय विशाल भंडारी म्हणाले, पोलिस स्टेशन च्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्त्वाप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतो.  महीला व मुलींना अडचणी आल्या तर 112 क्रमांक वर त्यांनी फोन केल्यास आम्ही तात्काळ त्याठिकाणी जावून त्यांना आम्ही मदत करतो. मुलींनी या सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले व पोलिस स्टेशन मध्ये चालणाऱ्या सर्व कामकाजाची महिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी एम. लॉ चे प्राध्यापक  ॲड. राजू भोसले म्हणाले, पीएसआय विशाल भंडारी हे  कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांचा आदर्श विद्यार्थी व युवकांनी घ्यावा.
यावेळी पीएसआय विशाल भंडारी यांनी  कायद्यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना ॲड. राजू भोसले यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले. याप्रसंगी  , यश पिसे, अजित दहीवडे, रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे , वैभव सोनवणे, प्रताप लिंगे , शिवानी कालेकर,  विजया बागल, हर्षदा वाघ, साक्षी लोटके, मालती केवटे, यांच्या सहीत पोलिस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!