शालेय मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत यासाठी न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा हिंगणी येथील व्यसनमुक्त युवक संघ यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
गतवर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत करत असताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, प्रदर्शन आणि रात्रभर मद्यपान करण्यास सरकारकडून दिली जाणारी खुली परवानगी देशाच्या युवा पिढीसाठी व भावी पिढीसाठी घातक असून याचा बालमनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, नववर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीची संकल्प शपथ घेऊन करा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून शाळा महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्यासाठी संकल्प शपथ घेऊन व्यसनमुक्तीचा नारा दिला
गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने गेली 25 वर्षे व्यसनमुक्तीसाठी सातत्याने जगत असलेला व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या हा उपक्रम राज्यभरात राबविला जातो दिनांक९जानेवारी२०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा (हिंगणी), तालुका माण, जिल्हा सातारा या विद्यालयामध्ये व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने श्री विठ्ठल भानुदास शेलार यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढेंबरे सर उपशिक्षक श्री बनसोडे सर श्री कदम सर तसेच श्रीमती शिरकांडे मॅडम व श्री तानाजी डोंगरे उपस्थित होते.