ओकिनावा मार्शल आर्ट गोंदवले खुर्द च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर मिळवले सुवर्ण यश.*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द ; प्रतिनिधी
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा युनीफाईट वेलफेअर असोसिएशन सातारा आयोजित दि. 09/06/ 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय युनीफाईट स्पर्धेत ओकिनावा मार्शल आर्ट गोंदवले खुर्द क्लास चे विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मास्टर श्री. विजय अवघडे सर ब्लॅक बेल्ट 2nd दान यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले सुवर्ण यश. जाशी माध्यमिक विद्यालय जाशी ता माण शाळेतील विद्यार्थीनी कु.प्रेरणा प्रमोद पोळ हिने इयत्ता 9 वी वयो गट 17 मधून युनीफाईट स्पर्धेत प्रावीण्य सिद्ध करून राज्यस्तरावरील गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द ता. माण मधील विद्यार्थी चि. श्रेयश सुभाष शेडगे याने इयत्ता 7 वी वयो गट 17 मधून आपले प्रावीण्य सिद्ध करून राज्यस्तरावर सिल्वर मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले कु. प्रेरणा, व चि. श्रेयश यांना मार्गदर्शक शिक्षक ग्र्यांड मास्टर श्री. आप्पा जाधव सर ब्लॅक बेल्ट 6 दान, मास्टर श्री. विजय अवघडे सर ब्लॅक बेल्ट 2nd दान , सहकारी शिक्षक श्री. आदिनाथ शिंदे सर ब्लॅक बेल्ट, अजिंक्य अवघडे सर ब्राउन ब्लॅक बेल्ट, श्री. विजय साळुंखे सर , श्री.सादिक शेख सर, श्री.दडस सर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे,पालक श्री. प्रमोद पोळ, सौ.गीतांजली पोळ,श्री सुभाष शेडगे, सौ.वर्षा शेडगे, मा.मुख्याध्यापक श्री. टकले एम. डी., सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी क्रीडा शिक्षण विभाग अधिकारी श्री. युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी श्री.खरात सर, व सौ. भोसले मॅडम रयत शिक्षण संस्था पदाधिकारी,युनीफाईट असोसियेशन पदाधिकारी श्री. सूर्यवंशी सर, श्री. शिंदे सर स्कुल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, आजी माजी विद्यार्थी विद्यार्थीनी, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, मुंबई विकास मंडळ गोंदवले खुर्द, गोंदवले खुर्द ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले हार्दिक शुभेच्छा दिल्या.