म्हसवडच्या मेरी माता हायस्कूलचा दमदार जलवा! जिल्हास्तरीय आष्टेडू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सातारा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि सातारा जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय आष्टेडू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धा 2025-26 दहिवडी कॉलेज येथे पार पडल्या.
१४, १७ आणि १९ वर्षाखालील मुले-मुली या वयोगटांमध्ये शिवकला, दांडपट्टा, मर्दानी कला, पद संतुलन व भाला संतुलन या विविध पारंपरिक क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी कौशल्याचा अद्भुत आविष्कार सादर केला.
या स्पर्धेत मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथील 14 विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली असून सर्व १४ खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मेरी माता हायस्कूलचे सुवर्णवीर
भाला संतुलन –
1. आर्यन पिसे – 14 वर्षाखालील गट – गोल्ड
2. यशराज देवकाते – 17 वर्षाखालील गट – गोल्ड
3. आदर्श सराटे – 19 वर्षाखालील गट – गोल्ड
मर्दानी कला –
4) ओम सराटे – 36-40 किलो, 14 वर्षाखालील – गोल्ड
5) सोहम बनसोडे – 41 किलोवरील, 14 वर्षाखालील – गोल्ड
6) स्वराज सूर्यवंशी – 36 किलो खालील, 17 वर्षाखालील – गोल्ड
7) शिवम रणवरे – 37-41 किलो, 17 वर्षाखालील – गोल्ड
8) राजवर्धन पोळ – 42-46 किलो, 17 वर्षाखालील – गोल्ड
9) हंसराज जगताप – 47-51 किलो, 17 वर्षाखालील – गोल्ड
10) तन्मय काळेल – 51-56 किलो, 19 वर्षाखालील – गोल्ड
11) आयुष काटकर – 57-60 किलो, 19 वर्षाखालील – गोल्ड
12) देवराज डोंबे – 63 किलोवरील, 19 वर्षाखालील – गोल्ड
13) प्रथा टाकने – 56 किलोवरील, 17 वर्षाखालील (मर्दानी कला) – गोल्ड
14) सिया सरगर – 40 किलोवरील, 14 वर्षाखालील (मर्दानी कला) – गोल्ड
मेरी माता हायस्कूलचा ऐतिहासिक पराक्रम
या सर्व 14 पैकी प्रत्येक खेळाडूने सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे हा प्रशालेचा इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य फादर सानू सर, तसेच क्रीडा शिक्षक संतोष खासबागे सर आणि आकाश गुजरे सर आणी प्रशिक्षक बंडू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

