विहिर/नदी वरील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद करुन त्यांच्याकडून २ लाख,३६,हजार रुपये किंमतीच्या एकूण ४३ इलेक्ट्रीक मोटारी जप्त;स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई.
व्हिजन २४ तास न्यूज
प्रतिनिधी; सादिक शेख
गोंदवले खुर्द ;
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी
सातारा जिल्हयामध्ये विहीरीवरील मोटार चोरीचे बरेच गुन्हे घडले असल्याने व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सदरचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी रमेश गर्जे सहायक पोलीस निरीक्षक व अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे.दिनांक ९/१/२०२३ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना बातमी प्राप्त झाली की, पेरले ता.कराड जि. सातारा गांवातील इसमांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगैरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरलेल्या आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने, त्या इसमांना ताब्यात घेवून कारवाई करण्याचे आदेश अरुण देवकर पोलीस
निरीक्षक यांनी सपोनि रमेश गर्जे, पोउनि पाटील व विशेष पथकास दिले. विशेष पथकाने संशईत इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने विचारपूस करुन त्यांनी उंब्रज, औंध, बोरगांव, तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न केले. नमुद चोरटयांच्याकडून चोरीस गेलेल्या ४३ इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकूण २ लाख,३६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांच्यावतीने असे अवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांच्या / शेतकऱ्यांच्या विहीरीवरील किंवा नदीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीस गेलेल्या आहेत, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे संपर्क साधून संबंधीत पोलीस ठाण्यास तक्रारी द्याव्यात. सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि संतोष तासगांवकर, सपोनि रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउनि अमित पाटील, मदन फाळके,पोलीस अंमलदार उत्तम दबड़े, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ,शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार,मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा,श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.