नासप च्या राज्य शिंपी समाज कार्यकारिणी कडून आम. जयकुमार गोरे भाऊ यांचा सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड:-
नुकतीच नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर व सरचिटणीस अजय फुटाणे सह इतर राज्य स्तरीय पदाधिकारी यांनी शिष्टमंडळाने सातारा जिल्हा नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे माध्यमातून म्हसवड येथे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांची भेट घेऊन संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार गोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिष्टमंडळात नाशिक विभागीय उपाध्यक्ष रवींद्र राहणे, विश्वस्त दिलीपकाका लंगडे नाशिक जिल्हा नासपचे जिल्हाध्यक्ष अतुल मानकर पुणे भाजपचे पंकज सुत्रावे चार्टर्ड अकाऊंट अजिंक्य शिंदे सौ सीमाताई नेवासकर आदीं उपस्थित होते यावेळी शिष्टमंडळाने शिंपी समाजाच्या वतीने राज्य स्तरीय अडचणी व्यक्त केल्या व या अडचणी सोडवणूक कामी आमदार गोरे यांचेकडून मदतीची अपेक्षा केली यावेळी आम. जयकुमार गोरे यांनी शिंपी समाजाच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवरुन लागेल ती मदत करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले यामुळे राज्य भरात शिंपी समाजांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे व पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरीचे सुशोभीकरण व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत