राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड –
माणतालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन येथील श्री सिद्धनाथ रिंगावन यात्रेनिमित्त भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला लाखो भाविक, शेतकरी, व नागरीकांनी भेट देत अनेक वस्तू व वाहनांची विक्री होऊन कोट्यावधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनात झाली. येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवानिमित्त रिंगावन यात्रा भरली असून यात्रेनिमित्त प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन 12 ते 15 डिसेंबर दरम्यान तीन दिवसाचे येथील बाजारपटांगण येथे भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात गृह उपयोगी वस्तू, कृषी क्षेत्राशी निगडीत औजारे, वन औषधी, बालगोपाळांसाठी वस्तूंचे स्टॉल्स, दुचाकी चार चाकी वाहने, खाद्यपदार्थ यासह अनेक गरजेच्या वस्तूंचे स्टाॅल, पशू गाय बैल या प्रदर्शनात सामील झाले होते. प्रदर्शन पाहून आल्यावर शेतकरी व नागरीक यांनी कृषी प्रदर्शनाचे आयोजक तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने यांना धन्यवाद देत पुढील वर्षी ही कृषी प्रदर्शन भरवा तेही या पेक्षा मोठ्या भव्य स्वरुपात असेही यावेळी सांगितले. चौकट – या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरले ते पुंगणूर जातीची तीन फुटी गाय व माणदेशी खिलार खोड.