राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांना 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ :मंत्री ॲड. आशिष शेलार
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
मुंबई, –प्रतिनिधी
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी अंतिम मुदत वाढवून 10 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली असून हा निर्णय नाट्यसंस्थांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख पूर्वी 31 ऑगस्ट होती. मात्र गणेशोत्सव, पावसाळी अडचणी आणि नाट्यसंस्थांच्या मागणीचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आल्याचे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.
जास्तीत जास्त नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी व्हाव्यात, यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयास मुदतवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयानंतर राज्यभरातील नाट्यसंस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक नाट्यसंस्थांनी आपली प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर 10 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावी.

