**फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदलच्या विद्यार्थ्यांचा एस.एस.सी. बोर्ड 2024 परीक्षेत उत्तुंग यश**
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
नांदल(फलटण )
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. बोर्ड 2024 परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा 100% निकाल मिळवला आहे. परीक्षेत नोंदणीकृत आणि बसलेले सर्व 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
**निकालाची तपशीलवार माहिती:**
* विशेष प्राविण्यप्राप्त: 13 विद्यार्थी
* प्रथम श्रेणीत उत्तीर्ण: 17 विद्यार्थी
* द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण: 13 विद्यार्थी
* पास श्रेणीत उत्तीर्ण: 0 विद्यार्थी
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. राजश्री आबा कोकरे हिने 94.40% गुण मिळवून प्रशालेत प्रथम व आदर्की केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कु. दिव्या सुरेश कोळेकर, हिने 93.40% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कु. अनुष्का महेंद्र कोळेकर व कु. आरती उत्तमराव सरक यांनी 91.40% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
संस्था सचिव अध्यक्ष व स्कूल कमिटीचे चेअरमन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले