आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल लागला असून लोखंडे सानिका शंकर हिने 95.60 टक्के गुण मिळवून म्हसवड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :-. प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने SSC परीक्षा 2022-23 चा निकाल नुकताच जाहीर केला. या परीक्षेमध्ये मध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल लागला असून लोखंडे सानिका शंकर हिने 95.60 टक्के गुण मिळवून म्हसवड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे
शैक्षणिक वर्ष 2022- 23मध्ये म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत आत्मगिरी माध्यमिक विद्यालय मधील इयत्ता दहावीच्या वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत SSC बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला. या शाळेमधील प्रथम तीन क्रमांक
प्रथम- कु. लोखंडे सानिका शंकर 95.60%
द्वितीय- मुल्ला आयेशा समीर 94.00% तृतीय- खांडेकर गौरी सुभाष 93.40% पिंगळे सानिका राजेंद्र 91.60% गायकवाड आकांक्षा सुनील 91.00% गोंजारी यशश्री अनिल 91.00% कापसे सोहम संतोष 90.60% गुण संपादन करून उज्वल यश मिळवीले.
तसेच गणित विषयात 100 पैकी 100 गुण लोखंडे सानिका शंकर व मुल्ला आयेशा समीर या विद्यार्थिनीने मिळवले आहेत
एकूण 65 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते पैकी 90% च्या वर आठ विद्यार्थी, 75 % च्या वर 26 विद्यार्थी, तर 23 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे व 8 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सौ. सुलोचना बाबर, उपाध्यक्ष एडवोकेट इंद्रजीत बाबर, संचालक शरयू बाबर देवकर व तात्यासाहेब अवताडे, मुख्याध्यापक अनिल माने, शिक्षक वर्ग तसेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.